भाषिक खेळ
तुम्हाला खालील भाषिक खेळांत नवीन प्रश्न सुचवायचे असल्यास
[email protected] या पत्त्यावर आपला प्रश्न पाठवा. तुमचा ऋणनिर्देश केला जाईल.
यामध्ये एका शब्दात लपलेले शब्द शोधायचे आहेत
उदाहरण
'सातारा' या शब्दातले दोन शब्द शोधा?
उ: तारा, सारा
मुरजबंध म्हणजे जो शब्द किंवा शब्द समूह, जो उलटा वाचला तरी तोच शब्द किंवा शब्द समूह मिळतो.
उदाहरण
प्रः अधिक चागंला
उः सरस
या खेळा मध्ये एका शब्दातील एक-एक अक्षर बदलून आपल्याला पाहिजे असलेला शब्द तयार करायचा. कृपया या फक्त खेळासाठीच भाषेत नविन शब्द जोडू नका.
उदाहरण
प्रः 'वरण' वरुन 'फरशी' तयार करा.
उः
१. वरण
२. सरण
३. सरशी
४. फरशी