शब्दलेखनमध्ये काही त्रुटी असल्यास आम्हाला खालील ई-मेलवर कळवाव्यात. [email protected] लिहिलेला मराठी शब्द बरोबर लिहिला गेला आहे की चूक हे सांगणाऱ्या उपयोजनाची गरज अनेकांना जाणवते. 'शब्दलेखन' असे एक उपयोजन आम्ही तयार केले असून ते सादर करताना आम्हास आनंद होत आहे. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित काही तंत्रे आम्ही यात वापरली आहेत. शिवाय मराठीच्या व्याकरणाचे नियमही ह्या उपयोजनाला शिकवले आहेत. मराठीत एखाद्या शब्दापासून लिंग, वचन, विभक्ती, क्रियापदांच्या बाबतीत काळ इत्यादीचे प्रत्यय जोडून अनेक शब्द तयार होतात. अशा शब्दांची संख्या फार मोठी आहे. मूळ शब्द किंवा त्यांची रुपे 'शब्दलेखन' मध्ये तपासता येतात. उदाहरणार्थ, माणूस ह्या शब्दाबरोबर माणसाला, माणसाने असे शब्द किंवा करणे (करू, केल्याने, करत, करण्यासाठी) असे शब्दही बरोबर का चूक हे आपण उपयोजनामध्ये तपासू शकतो. हे उपयोजन विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या उपयोजनामध्ये काही चुका असण्याची शक्यता आहे. योग्य रितीने लिहिलेला शब्द चूक आहे असे सांगणे किंवा चुकीचा शब्द बरोबर आहे असे सांगणे अशा दोन्ही चुका शक्य आहेत. शब्दांच्या जाती, मूळ अर्थ व समानार्थी शब्द हे कृत्रिम प्रज्ञेच्या साह्याने शोधले असल्यामुळे ते चुकीचे किंवा त्यामध्ये शुद्धलेखनाच्या त्रुटी असू शकतात. आपण मराठीचे अभ्यासक आणि तज्ज्ञ या नात्याने अशा चुका लक्षात आणून दिल्यास त्या दुरुस्त केल्या जातील.